E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या 'रील बॉय' ठोकल्या बेड्या
Samruddhi Dhayagude
08 Apr 2025
उन्नाव : सोशल मिडियाची भुरळ तरुणाईला अशी काही पडली आहे की, लोकप्रिय होण्याच्या नादात बेभान होऊन कृती करत असतात, अशा वेडापायी आपला जीवही धोक्यात घालताना दिसतात. काहींनी यात प्राण गमावले आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात नुकतीच घडली. एक तरुण रिल्स बनवण्याच्या नादात जीवावर उदार होऊन कृती करताना दिसत आहे. पण कायद्याने त्याच्या मुसक्या अखेरीस आवळल्या. सध्या तो तरुण कारागृहात आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात एक तरुण रेल्वे मार्गावर मध्यभागी मोबाईल घेऊन झोपला आणि संपूर्ण ट्रेन त्याच्या वरून गेली. या दरम्यान तो अंगावरुन जाणाऱ्या रेल्वेचा व्हिडिओ बनवत राहिला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ २५ सेकंदांचा आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, जीआरपी उन्नाव पोलिसांनी धोकादायक स्टंट करणाऱ्या रील बॉयचा शोध घेतला आणि त्याला तुरुंगात पाठवले.
हसनगंज न्योतानी येथील रहिवासी २१ वर्षीय रणजीत चौरसिया लखनऊ-कानपूर रेल्वे मार्गावरील कुसुंभी स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी पोटावर झोपला आणि हातात मोबाईल धरून अंगावरुन जाणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ करू लागला. या २५ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, त्या तरुणाने पांढरी पँट आणि पिवळा टी-शर्ट घातला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, ट्रेन गेल्यानंतर, तो तरुण उभा राहून ट्रेन जाताना पाहतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला शाहरुख खानच्या बादशाह चित्रपटातील "वादे से अपने मुकरता नही, मरने से मैं कभी डरता नहीं" हे गाणे ऐकू येते आहे.
जीआरपीने अखेर सोमवारी त्या तरुणाला शोधले, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला तुरुंगात पाठवले. तरुणावर कलम १३/२०२५, २८१ बीएनएस आणि १५० रेल्वे कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जीआरपी उन्नावचे प्रभारी अरविंद पांडे म्हणाले की, तरुणांवर गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओची चौकशी केली असता ही घटना खरी असल्याचे आढळले. जेव्हा ही घटना खरी असल्याचे आढळले तेव्हा त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
Related
Articles
पद्म किताबासाठी नामांकन आणि शिफारस प्रक्रिया सुरू
12 Apr 2025
राम मंदिर ट्रस्टला धमकीचा ई मेल
15 Apr 2025
बॉक्सिंग असोसिएशनच्या कारभाराची चौकशी व्हावी : एजाज हुसेन
17 Apr 2025
तहव्वूर राणाला भारतात आणले
11 Apr 2025
हिमनद्या वाचवण्यासाठी तपमानवाढ रोखावी लागेल
17 Apr 2025
पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप
14 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार